
दै.चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी
हाणमंत सोमवारे
अहमदपूर :-आज प्रशालेत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लातूर रोड येथील प्राध्यापिका श्रीमती इंगळे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री कदम सरांनी पण याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. आजच्या दिनाचे औचित्य साधून अहमदपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री ढोकाडे साहेब यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या 100% विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अफरोज सिद्दिकी सरांनी पाच होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी सह दत्तक घेतले आहे त्यांना पण आज गणवेश देण्यात आले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री अफरोज सिद्दिकी सरांनी केला.तर जि प प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते..