
दै.चालु वार्ता प्रतिनिधी
विष्णु मोहन पोले
लातूर:दिनांक 28 जुन रोजी दुपारी12 ते 5 वाजता शिवाजी चौक ते 5 नंबर चौक लातूर ते लातुर जिल्हाधिकारी कार्यालय इथ पर्यंत भाडोत्री सभासदाच्या मागणी साठी विराट मोर्चा निघणार आहे.सविस्तर बातमी अशी की, रयत दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाला लातुर शहरातील बेघर भाडोत्री सभासदांना सरकारी मोकळ्या जागेत हक्काचे घर बांधून राहण्याच्या संदर्भात 33×33 एक गुंठा जमीन प्रत्येक सभासदांना भाडे पट्याने देण्यासाठी ह्या विराट मोर्चाच आयोजन केल आहे तरी सर्व जनतेने या मोर्चात सामील होण्यासाठी चे अवाहन दलित रयत स्वयं सेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे…