
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विश्व हिन्दू परिषद बजरंग दला कडून किनवट तालुक्यातील शिवनी आपारावपेठ येथे गो सेवकावर झालेल्या हल्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
व या हल्यात मृत पावलेल्या आणि जख्मी असलेल्या गो सेवकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, गो सेवकावर हल्ला करणाऱ्या कसायाना कड़क आणि कठोर कार्यवाही व्हावी आशी मागणी ही करण्यात आली.
महाराष्ट्रात गोवंश कायदा असताना सुद्धा खुलेआम गोवंश ची हत्या होते यावर कड़क अंमलबजावणी करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा मंत्री शशिकांत पाटिल गजानन पांचाळ, राजेश देशमुख, गणेश कोकुलवार, डॉ रविकुमार चटलवार, श्रीराज चक्रवार, महेश देबड़वार, प्रशांत दासरवार हे उपस्थित होते…