
दै.चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा-भुम आगाराची परिवहन महामंडळाची बस क्र (एम एच २० बी एल २८०५) या नंबरची बस बार्शीहुन भुमकडे रवाना झाली असता भांडगाव शिवारात माळी वस्ती जवळ एसटीबस अलिकडील बाजुस खड्डा वाचवताना ड्रायव्हरच्या बाजूला बस ब्रेक फेल होऊन पलटी झाली आहे बसमध्ये एकुण ४० ते ४५ प्रवासी होते जखमींना उपचारासाठी मानकेश्वर सरकारी दवाखाना येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी भुम येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तसेच जखमी प्रवासी आपापल्या सोईनुसार बार्शी भुम जवळा नि . मानकेश्वर या ठिकाणी उपचार घेत आहेत
तसेच जवळा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सम्राट माने पोलिस नाईक स्वामी हे घटना स्थळी दाखल झाले प्रवाश्याना मदत केली तसेच मानकेश्वर जवळा नि. भुम येथील आरोग्य विभाग अतिदक्षता विभाग यांनी अति तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले
प्राथमिक अंदाजानुसार बसमधील प्रवाशांची कुठली ही जीवीत हानी झालेली नाही असे समजते…