दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
बल्लारपूर: जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे, आमचे आदर्शस्थान, मार्गदर्शक महाराष्ट्रात विकास पुरुष अशी ख्याती प्राप्त असलेले मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया व चंद्रपूर जिल्हा यांची समाजसेवेची प्रेरणा घेऊन उभारलेली समाजसेवी संस्था सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि.नं. चंद्रपूर 0000113/2022 ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) तर्फे आज दिनांक 24.06.23 ला नवोदय प्रवेश परीक्षा , ज्या परीक्षेत शहरासाठी राखीव व 20 टक्के हें ग्रामीण विभागासाठी राखीव 80 टक्के असते. अशा परिस्थितीत ही संपूर्ण बल्लारपूर शहरातून स्पंदन मेश्राम, पारुल निमजे या दोन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण नव्हे तर परीक्षेत मेरिट आल्याबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे,संस्थे तर्फे बल्लारपूर मधील वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा सर व सुनील टडम जी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला असून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात दिल्या असा संदेश पाठविला. या सत्कार कार्यात बल्लारपूर शहराचे वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा सर जी, श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, सुधाकर सिक्का जी, श्रीनिवास पिसार जी, कमल वर्मा जी, नारायण सुक्का जी, विनोद कोवे जी,सतीश बेमकुरी जी उजव,बुझाडे जी,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
