
दै.चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी
भारत पा.सोनवणे
वैजापूर– शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम पुर्ण झालेल्या लाभार्थ्यास माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मा.साबेरखान यांच्या हस्ते माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घराची चावी सुपुर्द करण्यात आली, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वैजापूर शहरात ८१५ पैकी ६१५ घरकुलांचे कामे पुर्ण झाली आहेत. त्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घराच्या चावीचे सोमवारी वाटप करण्यात आले. यावेळी दशरथ बनकर, प्रकाश चव्हाण, उल्हास ठोबंरे . राजू राज, वाणी . दिनेश राजपुत, पारस घाटे, सखाहरी बर्डे, रियाज अकील शेख, सुरेश तांबे, स्वप्नील जेजूरकर, बबन त्रिभुवन, राजू गायकवाड, निलेश भाटीया, गोकुळ भूजबळ, ज्ञानेश्वर टेके, ईमरान कुरैशी, शैलैश चव्हाण . गणेश खैरे, बजरंग मगर, बिलाल सौदागर, विनायक व्यवहारे, डॉ. परेश भोपळे उपस्थित होते.