
दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
बल्लारपूर: पावसाळा सुरू झाला की शहरातील नाली कच्च भरून जातात यातच आज २७/०६/२०२३ ला कन्नमवार वॉर्ड ते डॉ राजेंद्र प्रसाद वार्डातील मोठा नाला या दोन दिवसापासून सतत येत असलेल्या पावसामुळे झाडाच्या फांद्या व कचरा यांनी तुडुंब भरलेल्या होत्या जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो मोहीत डंगोरे यांनी आज सकाळी नगर परिषद बल्लारपूर चे स्वच्छता कर्मचारी यांना घेऊन या नाल्याची पाहणी करून साफसफाई करण्यात आली.व ते स्वतः या संपूर्ण कार्या वेळेस उपस्थित होते. ज्या नागरिकांना पाणी भरल्यावर त्रास सहन करावं लागले त्यांनी या कार्याबद्दल मोहीत डंगोरे यांचे आभार मानले.