
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी कार्यालयात उशीरा येतात व लवकर जातात नागरिकांना वेळेचं बंधन पण कर्मचाऱ्याला मात्र वेळेचे बंधन राहत नाही असं देगलूर मधील प्रत्येक कार्यालयामध्ये दिसून येत आहे शासकीय कार्यालयात कुठल्याही कामाला गेले की प्रशासन नागरिकांना विविध नियम , कायदे पुढे करत असते….आता जनतेने देखील प्रशासनाला बायोमेट्रिक हजेरी ची आठवण करून देणे आवश्यक आहे… ५ दिवसांचा आठवडा व ७वा वेतन आयोग लागू करताना सरकारने सर्व नोकरशाही ला बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केलेली आहे…जनतेला नियम शिकवणारी नोकरशाही मात्र स्वतः ला लागू असणाऱ्या नियमाला केराची टोपली दाखवत आहे…. यावर चा सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी आपापल्या विभागातील कर्यालातील प्रमुखांना आरटीआय अंतर्गत बायोमेट्रिक हजेरी ची मागणी करणे…. सर्व नोकरशाही चे वेतन हे नागरिकांच्या पैशातून केले जात असल्याने नागरिकांचा त्यांच्यावर हक्क आहे…जनता म्हणजेच आपण लोकशाही चे मालक आहोत हे लक्षात ठेवा….
आपणाला हेच माहिती नाही की प्रशासनाची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे….
नागरिकांना १ मिनिट उशीर झाला Window CLOSED असा बोर्ड नागरिकांच्या तोंडावर मारला जातो मग त्यांनी देखील कार्यालयीन वेळेचे पालन करणे गरजेचे नाही का ? नियम मात्र सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नाही का असं कुठेतरी प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे..