
दै.चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी
भारत पा.सोनवणे
श्री संत शंकर स्वामी महाराज यांनी शके १७११ ला श्री क्षेत्र शिऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर
या ठिकाणी पायी दिंडी सोहळ्यामध्ये जात असतांना मौजे वरकटणे’ ता. करमाळा या गावी वाड्यामध्ये स्वा्मींनी मुक्काम केला होता वाड्यात सर्पाला बोलविले व पंढरपूर येथे त्याला समाधी दिली.
त्या जागेचा जिणोंध्दार व्हावा म्हणुन ‘श्री संत शंकर स्वामी महाराज समाधी संस्थान श्री क्षेत्र शिऊर ता. वैजापूर, जि.छ.संभाजीनगर व
मौजे वरकटणे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न होत असुन त्या जागेचा लवकर विकास व्हावा म्हणून ही संतसेवा करूया
श्री ह भ प सारंगधर महाराज भोपळे व ह भ प रामभाऊ महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी जात असतांना संस्थानचे कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, विश्वस्त शिवाजी साळुंके व अनेक वारकरी भाविकांनी या वेळी श्रमदान केले तसेच वरकटणे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले