
दै.चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई- ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय. जवळगाव रोड भारज पाटी ता.अंबाजोगाई जि.बीड या शाळेत सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.पंडित देशमुख सर होते व प्रमुख पाहुणे श्रीराम माध्यमिक विद्यालय या शाळेचे जेष्ठ सह शिक्षक श्री .नाथराव तिडके व दतात्रय भालके हे होते यावेळी राजे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. व श्री तिडके सर यांनी श्री शाहू महाराज यांचे कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी गावामध्ये रँली काढली वनंतर मुलांच्या चित्रकला स्पर्धा व मुलीच्या रांगोळी स्पर्धा घेतल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले…