
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. या गुणगौरव सोहळ्यास आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपकराव भराटे सर, दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वरजी बद्दर यांच्यासह विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.