
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा पुढाकार..
दै. चालू वार्ता
भिगवण प्रतिनिधी जुबेर शेख
भिगवण : यंदा च्या वर्षी गुरुवारी (दि 29 )आषाढी एकादशी आणि मुस्लिम धार्मियामधे पवित्र समजल्या जाणाऱ्या बकरी ईद एकाच दिवशी येत असली तरी आषाढी एकादशी या पवित्र दिवशी कुर्बानी देणार नाही असा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला.भिगवण पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांच्या उपस्थिति मधे मुस्लिम बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी एकादशीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकच दिवशी आहे. आषाढी आणि बकरी ईद दोन्ही मोठे सण आहेत.श्री संत योगिराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळया चे भिगवण मधे देखील मुस्लिम समाजातर्फे दिमाखदार असे स्वागत करण्यात आले होते तसेच वारकरी यांच्या साठी सरबत व नाष्टया ची सोय देखील केली होती.याच हिन्दू मुस्लिम एकोपा ला वाव मिळण्यासाठी,वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मुस्लिम बांधव बकरी ईद दुसऱ्या दिवशी साजरी करणार आहेत.
ईद च्या दिवशी फ़क्त नमाज पठन करण्यात येईल व कुर्बानी शुक्रवारी दि 30 रोजी करण्यात येईल असा निर्णय भिगवण पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांच्या बरोबर असणाऱ्या बैठीकी मधे ठरविन्यात आले.सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय मुस्लिम बांधव यांनी घेतला या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.
यावेळी हाजी जुबेर कुरेशी,सलीम सय्यद, जब्बार शेख, ज़मीर शेख ,तय्यब शेख,रियाज शेख,मुस्लिम युवक संघटना अध्यक्ष सलमान शेख,मा ग्रामपंचायत सदस्य जुबेर शेख,जमीर शेख,अस्लम मुलानी,हाफिज असदभाई शेख,हाफीज जब्बार भाई तांबोळी,शाहजाण तांबोळी,आसिफ बागवान,मोहसीन शेख,सोहेल शेख,मोहसीन सातारे,रेहान तांबोळी,साहिल शेख उपस्थित होते.