
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी) – परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज दि.२८ जून संस्था वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, तसेच शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे , शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयात केंद्रिय अध्यक्ष डॉ. सुरेंद्रभाऊ आलूरकर, स्थानिक संस्थेचे सहकार्यवाह गिरीशभाऊ गोळे ,तहसीलदार साहेब राजाभाऊ कदम, सदस्य भागवतजी तम्मेवार,मुख्याध्यापक दमन देगावकर, बालासाहेब केंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व श्रीगुरुजी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. माननीय अध्यक्षांच्यावतीने ध्वजारोहन करून वंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वैयक्तिक पद्यानी झाली.माध्यमिक निकाल वाघमारे वसंत यांनी सादर केला तर प्राथमिक शिष्यवृत्ती निकाल जाधव सचिन यांनी सादर केला .
यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते विद्यालयाचे सहशिक्षक मिरलवार दत्तात्रय यांनी संस्थेविषयी माहिती दिली. यामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची वाटचाल व कार्य याविषयी माहिती मुलांना सविस्तर माहिती दिली.संस्थेच्या कार्यात सहभागी सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ मान्यवर मंडळींची उणीव जरी भासत असली तरी त्यांचे कार्य व मार्गदर्शनाच्या गोष्टी सदैव आपल्याला त्यांची उपस्थिती दर्शवत असते असे या प्रसंगी त्यांनी सांगितले.
यानंतर मा.सुरेंद्रभाऊ आलुरकर यांनी अध्यक्षीय समारोपात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले. यावर्षी ज्या पद्धतीने शंभर टक्के निकाल लागलेला आहे.ते सतत नियमितपणे चालावे अशा शुभेच्छा दिल्या व पालकांनी शिक्षक व पाल्यास सहकार्य करावे जेणेकरून विद्यार्थी प्रगती होण्यास अडथळा येणार नाही असे सांगितले.
शेवटी उपस्थित सर्व पालकांचे व मान्यवर मंडळींचे मुख्याध्यापक केंद्रे बालासाहेब यांनी आभार व्यक्त केले. शांतीमंत्र सुजित मुगुटकर यांनी सादर केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास शेळके यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले