
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी अबंड ज्ञानेश्वर साळूंके
कराडमध्ये राहत्या घरांतील स्वयंपाक घरात नवविवाहितेने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. तर सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने देखील हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कराड तालुक्यांतील विंग येथे रविवारी घडली या घटनेनंतर संताप झालेल्या नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतल्यांने काही काळ तणावांचे वातावरण निर्माण झाले. नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर सासू राणी अंकुश माने यांच्यावर खाजगी रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील नीलम हिचा तीन महिन्यापूर्वी विंग येथील अनिकेत माने यांच्याशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम ही स्वयंपाक घरात झोपली होती. तर पती अनिकेत सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघेजण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारांस नीलम दरवाजा उघडत नसल्यांने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून स्वयंपाक घरात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अंगाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्यांचे निदर्शनांस आले. या घटनेची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई जिल्हा रुग्णालयात पाठवला. मृत नीलमचे माहेरकडील नातेवाईक कराडमध्ये दाखल झाले त्यांनी कराड तालुका पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती. मात्र नातेवाईक सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्यांच्या निर्णयावर ठाम होते. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.