
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
कंधार:- कंधार नगर परीषद च्या आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभाराला कंधारची जनता चांगलीच वैतागली आहे. कंधार शहरातील सिध्दार्थ नगर मध्ये मुख्य रस्त्याच्या मधोमध विद्युत पोल असुन या रस्त्यावरील विद्युत पोलमुळे नागरिकांस आपली वाहाने घेवून जाण्या येण्यासाठी मोठा आडथळा ठरत आहेत. राञीला रस्त्यावरील लाईट नसल्यास मोठा आपघात होण्याची शक्यता आहेे सिध्दार्थ नगर मध्ये पुर्वी याच मूख्य रस्त्यावर राञीला वाहानाने लोखंडी पोलला धडक दिल्यामुळे लोखंडी पोल वाकला आहे या पोलवर विद्युत असल्यामुळे मोठा धोका टळला आहे. आणि गेल्या विस ते पंचविस वर्षापासुन पोल तसाच आहे. रस्त्यात मध्योमध आसलेले विद्युत पोल नागरीकाना मोठा आडथळा ठरत आहेत हे पोल काढण्यासाठी अनेक वेळा नगरपालीका प्रशासनाला मागणी करुनही पोल काढलेे जात नाहीत त्यामुळे नागरिक चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.
सिध्दार्थ नगर मधील पुर्व पश्चिम आणि दक्षिण ऊत्तर रोडवर रस्त्याच्या मधोमध विद्युत पोल आहेत त्यामुळे नागरीकाना आपली वाहाने घेवुन जाण्यासाठी हा पोल मोठा अडथळा ठरत आहे तर कांही लोखंडी विद्युत पोल वाकले आहेत तर सिमेंन्ट च्या पोलला बुडाशी तडे गेले आहेत वार्या वावदानामध्ये या पोलमुळे या भागातील नागरीकाना धोका होउ शकतो. या भागातील अनेक नागरीकानी अनेक वेळा या भागाचे नगरसेवक, मुख्याधिकारी, विद्युत महामंडळाचे अधिकारी याना तोंडी व लेखी सुचना देवुनही नागरीकांच्या निवेदनाला अधिकार्यानी केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले पोल काढण्यासाठी विद्युत मंडळाच्या अधिकार्याकडे नागरीकानी विचारणा केली आसता पोल काढण्यासाठी लागणारा खर्च कोण करणार असे उलट प्रश्न विचारून नागरीकाना माघारी पाठवल्या जाते. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि या मतदार संघाचे खासदार सुधाकर श्रंगारे आणि आमदार शामसुंदर शिंदे यानी सिध्दार्थ नगर मधील मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यासाठी वरीष्ठा शी बोलुन रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत पोल काढुन जनतेसाठी आडथळा ठरनारे रस्त्यावरील विद्युत पोल काढुन जनतेला होणारा ञास दुर करावा आशी मागनी मोठ्या प्रमाणात जनतेतुन केल्या जात आहे.