
आषाढी एकादशी निमित्त श्याम पवार यांच्या वतीने मोफत चहाचे आयोजन
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी ) निमित्त सह्याद्री अमृततुल्य स्पेशल गुळाच्या चहाच्या वतीने आज मोफत चहाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाग्यनगर येथील सह्याद्री अमृततुल्य चहाचे संचालक श्याम पाटील पवार यांच्या वतीने श्री संत मोतिराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र फळा व श्री संत योगीराज निवृती महाराज पेंडुकर यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्तांना लोहा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील सुप्रसिद्ध सह्याद्री अमृततुल्य स्पेशल गुळाचा चहाचे संचालक श्याम पाटील पवार यांच्या वतीने सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मोफत चहाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी ) निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्तांनी मोफत चहाचा आस्वाद घ्यावा अशी भाविक भक्तांना अग्रहाची विनंती श्याम पाटील पवार यांनी केली आहे.