
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापुर) : दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात विदर्भातील व विविध विचारसरणीच्या बुध्दीजीवींच्या उपस्थितीत एक संमेलन संपन्न झाले.
या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचे जाणते अभ्यासक प्राध्यापक भीमराव भोसले (हैदराबाद) यांनी डॉ.आंबेडकरांचे स्वतंत्र क्रांतिकारी चरित्र उलगडून दाखविले.ते म्हणाले की,अनेक वर्षांपासून स्वत:ला आंबेडकरी विचारवंत घोषीत करून केवळ काँग्रेसचे राजकारण वाढवण्यासाठी काही लोक डॉ.आंबेडकरांना समोर ठेवून समाजात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.डॉ.आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अत्यंत स्वतंत्र जाणीव असलेले आणि देशासमोरील प्रश्नांची उत्तरे देणारे होते,असे विचार डॉ.भीमराव भोसले यांनी या संमेलनात सविस्तरपणे मांडत असतांना या बाजारु विचारवंता पासून सावध राहून सच्ची आंबेडकरी विचारधारा समाजात रुजवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विविध दाखले संमेलनादरम्यान दिले.
या कार्यक्रमात शेतीच्या प्रश्नांवर बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे माजी अध्यक्ष ऍड.दिनेश शर्मा यांनी भारतापुढील सद्य आव्हाने आणि दिल्लीच्या बनावट शेती आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे झालेले नुकसान यावर सविस्तर चर्चा केली.ऍड.दिनेश शर्मा पुढे म्हणाले की,आज या देशात अनेक कठोर निर्णय घेऊन व्यवसाय आणि उद्योगात पारदर्शकतेला चालना मिळाली आहे आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे आणि भारताच्या भविष्यातील सुवर्ण युग सुरू होत आहे.
खारपाणपट्ट्याच्या मुळ समस्या व त्यावर १२ वर्षापुर्वी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांच्या अथक परीश्रमातुन शोधुन काढलेले अंतीम “सोल्युशन” वर लक्ष केंद्रित करीत या संमेलनास संबोधीत करतांना कृषी शास्त्रज्ञ डॉ.सुभाष टाले यांनी समाजाला पृथ्वीच्या आतील गुंतागुंतीच्या संरचनेत कोणत्याही अशास्त्रीय प्रकारची गडबड होण्यापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी या संमेलनावेळी दिला.
खारपाण पट्ट्यात लोकप्रिय घोषणाद्वारे शासन व प्रशासनाची आतापर्यंत दिशाभुल करीत कोट्यावधी रुपये कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या खिश्यात ढकलणाऱ्या काही “तिकडील” तथाकथीत शास्त्रज्ञापासुन सावध राहण्याची विनंती त्यांनी शासन,प्रशासनास या संमेलनाचे निमित्याने देत शास्त्रोक्त पद्धतीनेच जगावेगळ्या या खारपाणपट्ट्यातील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.अन्यथा येणाऱ्या पिढ्यांना गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल,असा इशाराही त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी दिला.
या प्रबोधनपर संमेलनास उपस्थितीत सर्व मान्यवर पाहुणे व बुध्दीजीवींचे स्वागत,वक्त्यांचा परिचय व प्रास्तविक श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद ऊर्फ बाबुजी नळकांडे यांनी केले.
या वैचारीक संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षा निवेदिताताई चौधरी होत्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गेल्या ९ वर्षातील देश विदेशातील दैदिप्यमान गौरवपुर्ण कार्याचा आढावा घेत,त्यांनी मोदी ९ या महाप्रबोधन मोहिमेअंतर्गत बनवलेल्या चित्रपटाचे सादरीकरण केले.
अमरावती जिल्हा बुध्दीजीवी प्रकोष्टचे समन्वयक विजय लाडोळे,दर्यापूर विधानसभेचे प्रभारी व मुख्य संपर्कप्रमुख गोपालभाऊ चंदन,दर्यापूर शहर भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र ढोकणे व्यासपीठावर उपस्थित होते.
अंजनगाव सुर्जी तालुका बुध्दीजीवी प्रकोष्ट सहसंयोजक सुभाष थोरात यांनी या संमेलनाचे सुत्र संचालन केले.तर दर्यापूर तालुका बुध्दीजीवी प्रकोष्टचे संयोजक प्रा.विनोद बिजवे यांच्या आभार प्रदर्शनानंतर संमेलनाची सांगता झाली.
विदर्भातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनेतील बुद्धीजीवी नेत्यांनी या संमेलनात सक्रीय सहभागी होत देशासमोरील समस्यांवर नव्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्नांना साथ देण्याचा संकल्प केला.
अंजनगाव सुर्जी तालुका बुध्दीजीवी प्रकोष्ट संयोजक ज्ञानेश्वर सुने,भारत राष्ट्र समिती (BCR) विदर्भाचे नेते धनंजय काकडे,भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) नेते विष्णु कुऱ्हाडे,वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकराव नवलकार,सदानंद नागे,शरद जोशी,प्रणित शेतकरी संघटनेचे नेते प्रा.जयकिरण गावंडे,बबनराव देशमुख,विजय लाजुरकर,पुरोगामी कुणबी समाजाचे नेते भास्करराव पुराळे,भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल कुंडलवाल,रविंद्र राजपुत,सुभाष हरणे,रोशन कट्यारमल,गंगाधर साबे,दर्यापूर तालुका मुख्याध्यापक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख परिमल नळकांडे यांच्यासह सुमारे १५० बुध्दीजीवीं मान्यवर या संमेलनास उपस्थित होते.