
आ.श्री.श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन…
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कलंबर :- श्री संत निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान ता. लोहा जि. नांदेड या ठिकाणी मंदिर सभा मंडप बांधकाम भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक २९जून वेळ दुपारी १२:०५ मिनिटांनी आयोजित केला असून उद्घाटक आ.श्री श्यामसुंदर शिंदे साहेब लोकप्रिय आमदार कंधार लोहा विधानसभा ,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉ.गोविंद नांदेड साहेब मा. शिक्षण संचालक पुणे ,प्रमुख अतिथी सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा महाराष्ट्र राज्य ,श्री मोहनराव पवार उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा,श्री जी.यू.कल्हाळे बि डी ओ लोहा ,श्रीधर गणपतराव धोंडगे दत्त दिंडी प्रमुख, श्री इंजि. नानाराव कदम, कार्यक्रमाचे ठिकाण वैष्णवधाम श्रीक्षेत्र कलंबर खुर्द ता.लोहा जि.नांदेड येथे भूमिपूजन सोहळा आयोजित केला असून परिसरातील भाविक भक्तांनी सभा मंडपाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व समस्त गावकरी मंडळी कलंबर खुर्द तसेच वैष्णवधाम संस्थान यांनी केले आहे…