
दै.चालु वार्ता
परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी तालुक्यातील नागापूर येथील 33 केव्ही ट्रांसफार्मर महावितरण कंपनीकडून अजून पर्यंत बसवण्यात आला नाही. यासंदर्भात त्यांनी 29 तारखेचा अल्टिमेटम महावितरण कार्यालयाला दिला होता. महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या 27 तारखेला 5 केव्ही चा ट्रांसफार्मर बसवला त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अभियंता साहेब महावितरण कार्यालय यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा महावितरण कार्यालय परळी आणि अंबाजोगाई कार्यालयाचे ऑफिस उघडू देणार नाही तसेच एक दिवस अगोदर नोटीस देऊन आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे.
या संदर्भात अंबाजोगाई महावितरण कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे साहेब आणि परळीचे महावितरण कार्यालयाचे कार्यकारी उपअभियंता श्री. अभिजीत राठोड साहेब यांच्याशी चर्चा केली त्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये वीज नव्हती त्यानंतर सहा तास वीज मिळू लागली परंतु आता येत्या 10 तारखेपासून नागापूर परिसरातील शेतकऱ्यांना 6 तासाऐवजी 10 तास विज मिळणार आहे असे नागापूर जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री , बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बीड, मुख्य अभियंता महावितरण लातूर तसेच संबंधित महावितरण कार्यालयाचे अधिकारी यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत आणि विविध वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
33 केव्ही ट्रांसफार्मरचे काम त्वरित सुरू करा त्यासाठी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करून ट्रांसफार्मर चे काम त्वरित सुरू करावे अन्यथा परळी महावितरण कार्यालय आणि अंबाजोगाई महावितरण कार्यालयाचे कार्यालय बंद करू तसेच जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य अभियंता साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून ट्रान्सफरचे काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.