
दै.चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव:-भूम तालुक्यातील पाथरूड ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत पैकी एक असुन पावसाळ्यापूर्वी गावातील बऱ्याच गटारी तुंबलेल्या अवस्थेत होत्या,त्याची त्वरित ग्रामपंचायत कार्यालयाने दखल घेऊन लगेच त्याची साफसफाई चे काम हाती घेऊन गाव अधिक स्वच्छ ठेवण्यात भर देत आहेत.
पावसाळ्यामध्ये रोगराई अधिक पसरत असते,त्याची दखल घेऊन गावातील घाणीचे साम्राज्य असलेले ठिकाणे व कचऱ्याचे ढीग आधीचा निपटारा होऊन गाव स्वच्छ करण्यात येईल मत गावचे सरपंच सौ.विजया शिवाजी तिकटे,उपसरपंच तानाजी बोराडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले.
गावातील नागरिकांना पावसळ्याच्या पाण्यापासून घाणीचे साम्राज्य व इतर कसल्याही त्रास होणार नाही याची ग्रा.प.च्या वतीने दखल घेण्यात येईल असे युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांनी सांगितले.साथीचे आजार पसरू नयेत यासाठी निर्जंतूकरणाची गावामध्ये फवारणी करून,पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याचा मानस ग्रामपंचायतीचा असल्याचे ग्राम विकास अधिकारी भागवत राठोड यांनी सांगितले.