
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा : – धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते प्रा बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी ) च्या शुभ मुहूर्तावर भावीक भक्तांना फळे वाटप करण्यात आले.
कष्टकरी शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हकेला अहोरात्र धावुन येणारे अन्यायाला वाचा फोडणारे निर्भीड तालुक्यातील निष्कलंक व्यक्तीमत्व धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते प्रा बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी ) च्या शुभ मुहूर्तावर पालम तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र योगीराज निवृती महाराज संस्थान पेंडु व श्री संत मोतिराम महाराज तिर्थक्षेत्र फळा या ठिकाणी पायी जाणाऱ्या भावीक भक्तांना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व धर्मवीर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.