दै चालू वार्ता
परतूर प्रतिनिधी नामदेव तौर
परतूर : तालुक्यातील येनोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पांदन रस्त्यांची तीन कामे मजुरांकडून करवून घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले. तसेच या मजुरांची ई-मस्टरवर हजेरीदेखील लावण्यात आली. प्रत्यक्षात काम झालेले नसताना मजूर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. ई- मस्टर तत्काळ बंद करून अपहार करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी सरपंच कांचन जोगदंड यांनी केली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांची कामे
करण्यात येत आहेत. या योजनेत मजुरांना ई- मस्टरद्वारे हजेरी लावण्यात येते. मात्र, रस्त्याची कामे झालेली नसताना बिले काढण्यात आल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील येनोरा येथे उघड झाला आहे.
परतर रोड ते हातडी तलाव, येनोरा
गावठाण ते पाटोदा शिव व परतूर पिंपळगाव ते साकळगाव शिव येथे कोणतेही काम न करता कामाचेही ई कामाच्या मान्यतेची मस्टर काढण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित रोजगार सेवक, अभियंता व गटविकास अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तसेच प्रत ग्रामपंचायतीकडे द्यावी अशी मागणी येनारा येथील सरपंच कांचन उद्धवराव जोगदंड यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे..
आंदोलनाचा इशारा
तीन रस्त्यांची कामे करण्यात आलेली नसताना त्याची बिले लाटण्याचा प्रकार सुरू आहे. रस्त्याच्या कामात मोठा अपहार झाल्याची शक्यता आहे. काम केलेले नसताना ई-मस्टरवर मजुरांनी काम केल्याचे दाखवण्यात आले आहेत. हे ई-मस्टर तत्काळ थांबवून कामांची चौकशी करून कारवाई करावी. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. –
कांचन उद्धवराव जोगदंड, सरपंच येनोरा