
दै.चालु वार्ता प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा-ता १ जुलै पंचायत समिती परंडा सभागृहा मध्ये हरित क्रांती चे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या ११० वी जयंती शेतकऱ्यांच्या हस्ते पुजन केले यावेळी कृषी सहाय्यक कांबळे यांनी स्व वसंतराव नाईक यांच्या जीवनशैलीचे मनोगत व्यक्त केले तसेच श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी चे डायरेक्टर/ लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके यांनी हरित क्रांती चे जनक स्व वसंतराव नाईक यांच्या जीवनातील कार्यशैली व शेतकऱ्यांनच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे महाराष्ट्र राज्यातील तिसरे मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांना वसंत बंधारा या नावलौकिक शब्दाने ओळख होती तर महाराष्ट्र राज्यात कडधान्य अन्न धान्याची कमतरता न भासून देणारे एकमेव सक्रिय नेते होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड/ फळबाग लागवड करून शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन झाडे लावा झाडे जगवा व पाणी अडवा पाणी जिरवा या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांनी सांगितले की स्व वसंतराव नाईक हे शेतकरी चळवळीतील नेते व महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाला पोसनारे उभारी सक्रिय नेते होते तर शेतकऱ्यांनी महाडिबीटी अंतर्गत शेती पुरक औजारे इतर साहित्य व भाऊसाहेब फुंडकर योजनेमधून फळबाग लागवड जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच पंचायत समिती परंडा चे सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राऊत यांनी पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे लाभ घ्यावेत असे आवाहन केले व शासकीय योजनांची माहिती प्रत्येक शेतकर्यांपर्यंत उपलब्ध करून माहिती द्यावी. तसेच ह भ प बालाजी महाराज बोराडे यांनी जगाच्या संकट काळात सैन्यदल व शेतकरीच सर्वांचा आधार बनले आहेत बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे या संकटाला सामोरे जाणारे ही एकमेव शेतकरी बंधू भगिनींनी आहेत. कार्यक्रम समारोपात जिल्हा परिषद उस्मानाबाद शेष मधून पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना तुर, उडीद बियाणे मोफत देऊन नवनाथ घाडगे, भैरवनाथ यादव, विकास हगारे इ. शेतकर्याचां सत्कार ही केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कृषी अधिकारी श्री प्रशांत वास्ते यांनी केले यावेळी पंचायत समिती परंडा चे सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राऊत, तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब रुपनवर, तालुकास्तरीय शेतकरी समिती अध्यक्ष संतोष (श्याम) मोरे, आत्मा चे सदस्य अशोक गरड, ह भ प बालाजी महाराज बोराडे, कृषी विस्तार अधिकारी श्री सुरज बोडके, आत्मा चे बिटीएम अमोल पाटील, लघुउद्योग सल्लागार/ डायरेक्टर गणेशदादा नेटके, कृषी अधिकारी मनोज पाटील, तालुका व्यवस्थापक तुकाराम ढोरे, कृषी मंडळ अधिकारी एम आर तावरे, कृषी मंडळ अधिकारी कैलास देवकर, पंचायत समिती चे श्री घोडके बी., दै सकाळ चे पत्रकार प्रकाश काशीद, तालुक्याचे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, शेतकरी, शिपाई शाम काका, हिंगे जी. इ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री सुरज बोडके व डी.बी. गायकवाड यांनी केले.