
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम
भोकरदन:
भोकरदन शहरातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता विना परवाना बेकायदेशीर रित्या एका लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रेक्टरच्या काळ्या रंगांच्या ट्रोलीमधून एक ब्रास वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी वहातूक करत असताना मिळवून आल्याने भोकरदन पोलिसांनी ट्रक्टर पकडून कारवाई करून एकूण 5 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी समाधान जगताप यांच्या फिर्यादी वरून भोकरदन पोलिस ठाण्यात प्रकाश आप्पासाहेब जाधव वय 32 रा.फुलेनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास स.पोलिस निरीक्षक बालाजी वैध यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जाधव करीत आहे.