
दोन दिवस शाळाच भरली नाही हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांचा जयंतीचा पडला विसर
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा.दवणे मंठा
प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया असून शिक्षण फार महत्त्वाचे आहे. म्हणून तर शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे म्हटले जाते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत सबंध भारतामध्ये असताना हजारो कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार शिक्षणावर खर्च करते. प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थी दशेचा पाया म्हटले जाते.गावखेड्यासह शहर, तालुका, नगर आणि महानगरांमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी वाहताना दिसत असतानापहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरू होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. विदयार्थ्याना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मध्यांन भोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, अस्वच्छ परिसरातील कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता यासारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये राबविण्यात आल्या आहेत.
मात्र, केहाळ वडगाव येथील जयराम नगर पश्चिम तांडा येथील शिक्षकांना शाळेत जाण्याचा आणि शिक्षणाचा व आपल्या कर्तव्याचा विसर पडला. मग गाव खेड्याकडे ज्ञानदान होणार कसे हा पालकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केहाळ वडगावात ‘जयराम नगर’पश्चिम तांडा मध्ये इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून मुख्याध्यापक सस्ते आणि सहशिक्षक चव्हाण हे मागील दोन दिवसापासून गायब असल्याचे चर्चा पालकांमधून रंगत असताना शुक्रवारी शाळेत सर आले आणि शाळेला सुट्टी दिली. एक जुलै कृषी दिन आणि हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शाळेला दांडी तर मारली परंतु जयंतीचा ही विसर पडला असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. पालकांनी शिक्षकांना संपर्क साधला असता आम्ही ऑडिटला आहोत असे शिक्षकांनी पालकांना सांगितले परंतु गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता असल्या कुठल्याही प्रकारचे ऑडिट झालेले नसून याबद्दल किंवा या शिक्षकांबद्दल मला काही माहिती नाही. मग ऑडिट नसताना मुख्याध्यापक सस्ते आणि सहशिक्षक चव्हाण गेले कुठे हा पालकांना पडला प्रश्न विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे काय याकडे जिल्हा शिक्षण विभाग लक्ष देणार का असे पालकांमधून बोलले जात आहे.
मला ऑडिट बद्दल कुठलीही कल्पना नसून याबद्दल काही माहिती नाही आणि कोणत्याही प्रकारचा अर्ज आमच्या कार्यलयाकडे आलेला नाही. गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके..