
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
संबंधीत विभाग आणि गुत्तेदार यांची हात मिळवणी…!
देगलूर:हाणेगाव परीसरात आनेक गावात सध्या जल जीवन मिशन अंतर्गत बरेच कामे चालु असुन त्यात नवीन विहीर, पाईपलाईन, सिसी रस्ता, घरोघरी नळ आदी कामे असुन लाखो रुपयाची योजना शासन राबवीत आहे पण वरील कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे व दर्जाहीन होत आहेत.
परीसरातील हाणेगाव मानुर बेम्बरा रमतापुर कोकलगाव आदी गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामें चालु असुन याकडे कोणताच वरीष्ठ अधीकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही यामुळे गुत्तेदाराचे बोगस कामामुळे अधीकारी व गुत्तेदार यांची चांदीच चांदी होत आहे. वारंवार परीसरातील सामाजीक कार्यकर्ते वरीष्ठांकडे तक्रार करुन ही काही उपयोग होत नाही.मानुर या गावी तर चक्क तळ्यात विहीर काढुन गुत्तेदार चक्क जनतेची दिशाभुल करुन योजनेच्या मोठ्या निधीचा दुरुपयोग केला आहे तर एका गावी चक्क विहीरीला पाणीच नाही विहीर चक्क कोरडवाहु आहे आनेक गावात शासन परिपत्रक नुसार सर्वप्रथम विहीर खोदकाम झाल्याशीवाय पाईपलाईन करु नये पाईपलाईन ची खोली कमीत कमी तीन फुट खोली असा नियम असताना एक ते दीड फुट खोदुन गुत्तेदाराने कामे चालु केली आहे त्यात दर्जेदार पाईप १४०मी.मी.६की.ग्रा.आणि १०की.ग्रा. असे नियम असताना कमी दर्जाचे पाईप टाकुन कामे उरकुन घेत आहेत.एकीकडे शासन सांगतो की ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतुन जनतेच्या भौतीक सुख सुविधेसाठी शासन लाखो रुपयाची योजना राबवित आहे पण त्यावर संबंधीत विभागाच्या अधीकारीचा अंकुशच राहीला नसल्याने आनेक कामें बोगस व धातुर माथुर होत आहेत.
वारंवार पाण्याच दुष्काळ होत असुन आनेक गावात आजही लोकांना घागरभर पाण्यासाठी उन्हाळ्यात वनवन फीरावं लागतो आहे ही परीस्थीती सारखी राहु नये या हेतुने शासन जल है तो कल है या म्हणी प्रमाने जलजीवन मिशन योजना आमलात आनली आणि कोनतीही योजणा एकच वेळेस होते नंतर त्याला बरेच दिवस वाट बघावे लागते म्हणुन आलेल्या योजनेचा निधीचा वापर योग्यरीत्या झाल्यास लोकांना याचा लाभ चांगल्या प्रकारे घेता येतो पण ते आज राहीला नाही तर आर्धे तुम्ही आर्धे हमी ही संकल्पणा अलीकडचे नवीनच उदयास आली आहे याच्यातुन कामें बोगस व दर्जाहीन होत आहेत. म्हणुन परीसरात होणाऱ्या जलजिवन मिशन अंतर्गत कामाकडे संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधीकाऱ्यांनी लक्ष देऊन कामे दर्जेदार करावे अशी मागणी शेतकरी कष्ठकरी मजुरकार सुशीक्षीत नागरीक करीत आहेत.