
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कलंबर :-आषाढी एकादशी निमित्त श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत मोतीराम महाराज सभांडप उद्घाटन माननीय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या धर्मपत्नी सौ.आशाताई श्यामसुंदर पा. शिंदे यांच्या हस्ते दुपारी 01 वाजता करण्यात आले.यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर. सौ. आशाताई शिंदे यांचे शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सौ. लक्ष्मीबाई देवकर यांनी स्वागत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश पाटील घोरबांड गुरुजी यांनी केले, ते म्हणाले पहिला निधी देणारे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व सौ. आशाताई शिंदे हे आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यानंतर सौ आशाताई शिंदे यांनी आपल्या कार्याची सामाजिक धार्मिक राजकीय माहिती दिली या धर्म कामास मी कधी ही कमी पडणार नाही. हे संस्थान खूप मोठे होणार असे त्यांनी शुभेच्या देऊन सांगितले. आभार प्रदर्शन माधव पाटील घोरबांड यांनी मांडले.कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.सभामंडपाच्या भूमिपूजन सोहळ्याला परीसरातील भाविक, माता भगिनी,गावकरी मंडळी,भक्त मंडळी उपस्थित होते.