दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषी कोहिनूर, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले असे गौरवद्गार अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी टेंभुर्णी रोडवरील वसंतराव नाईक चौकाचे अनावरण प्रसंगी काढले.
महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचा एक जुलै हा जन्मदिवस महाराष्ट्र शासन कृषी दिन म्हणून साजरा करतो आणि या शुभमुहूर्तावर अहमदपूरच्या टेंभुर्णी रोडवरील चौकाला वसंतराव नाईक चौक असे नामकरण माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते त्यांनी पुढे असेही सांगितले की वसंतराव नाईक यांचे फार मोठे उपकार महाराष्ट्रावर आहेत त्यांनी 9 मे 1962 रोजी पंचायत राज् ची स्थापना करून महाराष्ट्राला पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती बहाल केल्या .एक मे 1962 ला औद्योगिक महामंडळाची स्थापना करून उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचे काम केले 12 ऑक्टोबर १९६४ रोजी ज्वारी संशोधन केंद्राची स्थापना केली आणि शेतकऱ्यांच्या ज्वारीला योग्य भाव दिला. महाराष्ट्राला 600 आश्रम शाळा देऊन वाडी तांड्याच्या मुलांना शिक्षणाची गंगा घरापर्यंत नेली .1965 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये महाराष्ट्राला भारताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे केले. 1966 च्या कोयना भूकंपामध्ये भूकंपग्रस्तांना दहा हजार घरे बांधून दिली. एक मे 1966 ला मराठी भाषेला राज्य राज्य भाषेचा दर्जा मिळवून दिला . 26 जानेवारी 1969 पासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना चालू करून इथल्या गोरगरिबांना आणि कष्टकऱ्यांना त्यांच्या हाताला काम दिले .1970 मध्ये कुळ कायद्यापासून पाच लाख 37 हजार 655 एकर जमीन भूमी हिना वाटप केली आणि १९७१ ला कापूस एकाधिकार योजना महाराष्ट्राला दिली. 1972 ला नवीन मुंबईची स्थापना करण्यात आली आणि असे क्रांतिकारी ठराव घेऊन नवीन मुंबईची उभारणी केली 1972 ला नवीन औरंगाबाद वसविले आणि नवीन औरंगाबाद हा जो दिसतो तो वसंतराव नाईक साहेबांच उपकार आहे. 1975 पर्यंत 14 लाख खेड्यांना वीज जोडणी दिली व तीन लाख शेतकऱ्यांना विद्युत पंप दिले. 28 मे 1976 ला राज्य बियाणे महामंडळाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नवीन नवीन बियाणे देण्याचं काम केलं. उजनी जायकवाडी अरुणावती अप्पर पेनगंगा येलदरी ईसापुर धरण राजाला बहाल केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा तर वसंतराव नाईक साहेबा सारखाच असावं . वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला वर्षा बंगला ही देणगी दिली आणि आज पर्यंत सगळेच्या सगळे मुख्यमंत्री त्या वर्षा बंगल्यामध्ये राहतात. राहुरी परभणी अकोला दापोली ही चार कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक यांनी स्थापन केली आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नवीन नवीन बियाण आणून दिली
दररोज दहा लाख मजुरांना काम देणारा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक होते असे ठामपणे सांगावे लागेल .चंद्रपूर परळी पारस कोराडी ही औष्णिक विद्युत केंद्र वसंतराव नाईक यांनी उभी केली आणि आज जो महाराष्ट्र विद्युत च्या बाबतीत परिपूर्ण आहे ती वसंतराव नाईकांचीच देणगी आहे आणि म्हणून वसंतराव नाईकला महाराष्ट्राचे हिरवे सपान असे म्हणतात आणि शेतकऱ्यांच्या गळ्यातलं ताईत म्हणतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दुरडीत कष्टकऱ्यांच्या दुरडीत भाकर देण्याचं काम हे वसंतराव नाईक यांनी केलं म्हणून वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.
या वसंतराव नाईक चौक अनावरण आणि सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान सिंह राजपूत सर हे होते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री धर्मपाल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिंगणे तात्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख , बोधिसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे, वरवंटीचे सरपंच श्री चंद्रकांत राठोड, गोर सेनेचे अध्यक्ष श्री संतोष राठोड, युवक नेते श्री विकास राठोड प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी श्री गणेश चव्हाण पत्रकार आणि साहित्यिक प्राध्यापक भगवान अमलापुरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते प्रमुख पाहुण्यांनी वसंतरावजी नाईक यांच्या कार्यावर उजाळा टाकला
पायलट किराणा सेंटरचे श्री अक्षय पाटील आणि चंद्रकांत मिरजगावे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
चौक अनावरण आणि जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार एन डी राठोड यांनी मानले..
