
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रोजगार हमी योजनेचे जनक
हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा येथे मान्वरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडुन आभिवादन करण्यात आले
स्व वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कृषीदिन म्हणुन साजरा करण्यात येतो
या निमित्ताने मान्वरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
स्व वसंतरावजी नाईक यांनी केलेले कार्य चिरकाळ स्मरणात राहणारे असुन कृषी कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान शेतकरांसाठी संजीवनी देणारे आहे असे प्रतिपादन सरपंच राजकुमार नरवटे पाटील यांनी केले.
याप्रससंगी राळगा गावचे सरपंच श्री राजकुमार नरवटे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण खांडेकर, माधव वडेर, अंकुश सुरनर, उत्तम वडेर, संदेश नरवटे, भुजंग खांडेकर, बालाजी राठोड, मद्देवाड ए के, गुळवे एस पी, पवार एस बी, अंगणवाडी ताई चंद्रकला देवकते , उत्तम राठोड, रवि पवार, मारोती वडेर, विठ्ठल जावीर, बाळु माने, रवि राठोड ,सुदाम चव्हाण, नारायण पवार, रोहिदास माने, विक्रम राठोड आदींची उपस्थिती होती…