
आता बिबट्या सोबत मैत्री करुन राहायचे का ? नागरीकांचा संतप्त सवाल
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि
अमोल आळंजकर
गंगापुर : गंगापुर तालुक्यातील भिवधानोरा तसेच अगरवाडगाव शिवारामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपला तळ ठोकलेला आहे. गुरुवारी पुन्हा रात्रीच्या सुमारास धानोरा धनगरपट्टी परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
संपुर्ण जून महिन्यामध्ये तब्बल आठ शेळ्यांचा फडशा पाडला आहे आता त्याने आपला मोर्चा पाळीव कुत्र्यांकडे वळवला आहे. धानोरा धनगरपट्टी रस्त्यावर गुरुवार रात्री एका वस्तीवर दोन कुत्र्यांना मारून बिबट्या रस्त्याच्या कडेला निवांत बसलेला होता धनगरपट्टी येथील दोन युवकांनी त्याचा व्हिडिओ आपल्या फोन मध्ये कैद केला आहे.