
शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेराकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरा मध्ये शैक्षणिक सत्र 2023 : 24 सुरुवात झाल्यानंतर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये व खाजगी शिकवणी वर्ग पूर्ण क्षमतेने चालू झाली आहेत. चांगले गुण मिळवून उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा खाजगी शिकवणीकडे कल वाढला आहे. साहजिकच मोठी विद्यार्थी संख्या झाल्याने रात्री ८व९ वाजेपर्यंत शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. या काळात रस्त्यावर मुलींची छेडछाड किंवा अन्य काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मात्र पोलीस यंत्रणेकडून कोणतीही उपाययोजना अद्याप केली गेली नाही हे वास्तव आहे. देगलूर शहरात नुकतीच घडलेली एक घटना आणि गत घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चिडीमार पथकाचे गठन होणे आवश्यक झाले आहे.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी शहरातील शिकवणी वर्ग परिसरात तसेच भाजी मंडई परिसरातभेटी देत अशा ठिकाणी वावरणाऱ्या टारगटांचा बंदोबस्त केला होता. त्यामुळे काही काळ तरी मुलींच्या, महिलांच्या छेडछाड प्रकारांना आळा बसला होता याचीही अनेकांनी आठवण करून देत दाखल झाला. चिडीमार पथकाची मागणी केली आहे.
देगलूर पोलीस ठाण्यात सध्या २ महिला पोलीस अधिकारी व ५ महिला कर्मचारी कार्यरत असताना आणि शाळकरी विद्याथीनीच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार समोर आलेला असताना पोलीस यंत्रणेने शाळा, महाविद्यालय, शिक वणीवर्ग, बाजार परिसरात बंदोबस्त, गस्त का सुरु केली नाही? याचे आश्चर्य वाटते. शालेय विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींसह घराकडे जात असताना तिला छेडण्याचा प्रकार झाला. सदर मुलीने प्रतिवाद केल्यानंतर देखील टारगेट व्यक्तीने आणखीच आक्रमक पवित्रा घेतला. काही जणांनी आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यामुळेसंबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पालकाने देखील तक्रार दाखल करण्याचे धाडस केल्यामुळे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
माजी आ. सुभाष साबणे यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून शहराबाहेर जाणारे रस्ते, अंतर्गत रस्ते व शहरातील अनेक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलीस ठाण्यात याचे चित्रीकरण उपलब्ध होत असते. याची देखभाल करण्याचे काम नगर परिषदेकडे आहे, असे सांगण्यात आले.. परंतु गत २ते३ वर्षात याची देखभाल केली गेली नसल्याने अनेक कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे अशा घडलेल्या घटनांतील आरोपींचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे. पोलीस खाते, नगर परिषद यांनी काहीतरी मार्ग काढून बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल करून यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक झाले आहे.