
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – 15 जुन पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून रायगड जिल्हा परिषद शाळा निगडी शाळेत लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.
तसेच शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी शाळेत EVM सारखी Voting machine Android ॲप व्दारे प्रत्यक्ष निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ नेमणूक करण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजून देण्यात आली.विद्यार्थ्यांमधून उमेदवार निवडून प्रचार करणे,प्रत्यक्ष मतदान नोंदवहीत नाव नोंदवणे ,हाताला शाई लावणे moc pollआणि प्रत्यक्ष voting machine वर मतदान करणे,निकाल पाहणे इत्यादी प्रात्यक्षिक उपक्रम घेण्यात आले.शालेय मंत्रिमंडळ निवडणूक जय शिवराय गट,राजमुद्रा गट आणि सावित्रीच्या लेकी गट अशी तिरंगी लढत झाली.निवडणुकीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.त्यात जय शिवराय गटाने विजय मिळविला .गटाचे अध्यक्ष कु.संचित दिपक वनगुले यांची शालेय मंत्रिमंडळ मुख्यमंत्री पदी ,उपमुख्यमंत्री पदी कु.आयुष मोरे तर अर्थमंत्री म्हणून कु.श्रावणी रेवाळे तसेच विरोधी पक्ष नेता म्हणून कु.मनस्वी पाखड यांची निवड करण्यात आली.विद्यार्थ्यानी अतिशय उत्साहात निवडणूक प्रक्रिया पार पाडली.शाळेचे SMC समिती अध्यक्ष श्री.संतोष पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या.
निकालानंतर नवीन शालेय मंत्रिमंडळाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि शिक्षकांकडून त्यांना पुढील कामासाठी शूभेच्छा देण्यात आल्या.सदर निवडणूक पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी म्हणून कु.प्रज्ञा पाखड, कु.श्रावणी रेवाळे तर शिपाई म्हणून मनस्वी पाखड तर पोलीस शिपाई म्हणून संचित वनगुले आणि व्हिडिओ शूटिंग आणि शूटिंग अंकेत पाटेकर यांनी पाहिले तर सहशिक्षिका सौ.रंजना चौरे मॅडम यांनी निवडणूक अधिकारी तर मुख्याध्यापक श्री.रमेश जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पार पाडले…