स्कुल बसचे भाडेही परवडेना…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे जालना…
मंठा शाळांच्या शुल्कवाढीवरून पालकांत ओरड सुरू असताना स्कूल बस भाडेवाढीचेही संकेत आहेत. ही भाडेवाढ झाली तर शाळेत सायकलनेच गेलेले बरे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. मात्र, अनेक शाळा घरापासून दूर अंतरावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना सायकलवर जाणेही सोयीस्कर ठरत नाही.
धावपळीच्या जीवनात मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांकडे वेळ नसतो. अशा वेळी स्कूल बसचा आधार घेतला जातो. यात मात्र मुलांच्या शिक्षणाचा खर्च दरवर्षी वाढत आहे. खाजगी शाळांकडून फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात येते. तसेच स्कूल बसचे भाडेही सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे शिक्षणाचा खर्च वाढून पालकांचे बजेट कोलमडणार आहे. यात शंकाच नाही. पोरांना सायकलवर पाठवायचे का..? आधीच खाजगी शाळांची फी भरमसाठ आहे. त्यात स्कूल बस भाडेवाढही दरवर्षी करण्यात येत असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पालकांचे बजेट कोलमडत आहे. आता पोरांना सायकलवर पाठवायचे का? असे पालकांकडून बोलले जात आहे. बहुतांश शाळांकडे स्वतःच्या स्कूल बस शहरासह तालुक्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे स्वतःच्या स्कूल बसेस आहेत. शहरासह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी या बसेस सोडल्या जातात. तर काही शाळांमध्ये खासगी बसमधून विद्यार्थी ये-जा करतात.
