दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशान्वये “मेरा बूथ सबसे मजबूत” या संवाद कार्यक्रमाकरिता अमरावती लोकसभा क्षेत्रामधून भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनीष मेन आणि भाजपा किसान मोर्चा जिल्हा सचिव सतीश मट्टे यांची निवड करण्यात आली होती.तसेच त्यांना १० दिवसाकरिता भाजपाकडून अल्पकालीन विस्तारक म्हणून पदभार सुद्धा देण्यात आला होता.मध्यप्रदेश राज्यातील मुलताई नगर,मोरखा,खिडकी बाजार येथे त्यांना सोपविलेल्या अल्पकालीन विस्तारक पदाचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडले.त्यामुळे अल्पकालीन विस्तारक जिल्हाध्यक्ष मनीष मेन व सतीश मट्टे यांच्या आगमाना निमित्त अंजनगाव सुर्जी शहरामध्ये भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास कविटकर यांच्या निवासस्थानी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत तथा सत्कार केला.
या प्रसंगी भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास कविटकर,शहर सरचिटणीस राजेंद्र रेखाते,शहर उपाध्यक्ष प्रवीण पटूकले,भाजयुमो शहर सचिव राहुल पंड,सुनील लोणकर,बुथ प्रमुख रमेश सदाफळे,हेमंत पंड,राजेंद्र बगळे,आकाश रायलकर,विवेक झाडे,अंकुश लोणकर,आदित्य उमक आदी पदधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते…
