
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी बीड
काल-परवा पार पडलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठी ऐतिहासिक आणि सांप्रदायिक पार्श्वभूमी असलेल्या धारुर शहरात ख्यातनाम भागवत-शिवपुराण कथाकार आदरणीय-पुजनीय-श्रध्देय श्री.आशिषानंद महाराज यांच्या छत्रछायेखाली साज-या करण्यात आलेल्या “गुरुपौर्णिमा उत्सव” कार्यक्रमात अंबाजोगाई येथील डॉ.सौ.ज्योती शेप-सिरसाट यांनी कोविड (कोरोना) काळात केलेल्या अविरत वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील “धर्मरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले….!
*कोरोना काळातील सेवेबद्दल हा दुसरा पुरस्कार*
—————————–
कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल हा डॉ.ज्योती शेप यांना मिळालेला द्वितीय पुरस्कार आहे. या अगोदरचा ‘धन्वंतरी पुरस्कार-२०२१’ हा प्रथम पुरस्कार “लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे गो-शाळेच्या” वतीने देण्यात आला होता.
*वैद्यकीय सेवेची जबाबदारी वाढली –डॉ.ज्योती शेप* —————————
केलेल्या कार्याचा सन्मान हा जरीकरीता काम करणाऱ्या व्यक्तीचा एका बाजूने मानपान वाढवत असेल तरी दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीची पुढील काळात जबाबदारीही वाढवतो. तेंव्हा एकाच कार्याबद्दल आणि तोही गुरुपौर्णिमे सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी मला परत दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्काराने तथा सन्मानाने माझी वैद्यकीय सेवेतील जबाबदारी आणखीणच वाढली असल्याची प्रतिक्रिया डॉ.ज्योती यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यावेळी व्यासपीठावर ह.भ.पा.आशिषानंद महाराज, धारुरचे नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी, मा.उपनगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, धारुर शहर पो.नि.विजय आटुळे, मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री.अनिल महाजन, कृ.उ.बा.स.सभापती महादेव तोंडे, शासकीय गुत्तेदार उदयसिंह दिख्खत यांच्यासह नगरसेवक, पत्रकार, व्यापारी ईतर पुरस्कारार्थींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.तर मोठ्या प्रमाणात महिला-पुरुष भाविक-भक्त मंडळींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड पाटील यांनी केली. सुत्रसंचलन पत्रकार सुनिल सिरसाट यांनी तर आभारप्रदर्शन स्वतः आशिषानंद महाराजांनी केले….!