
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद : भूम येथील सार्थक निवासस्थानी मा.नगराध्यक्ष संजय गाढवे,जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगीताताई गाढवे व युवा नेते साहिल आप्पा गाढवे यांच्या हस्ते डॉ.धनाजी राजाराम नाईकवाडी यांनी विज्ञान विषयात “पी एच डी” पदवी प्राप्त करून मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.धनाजी राजाराम नाईकवाडी यांनी डॉ.अंकुश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान – भारत (CSIR)च्या “सेंट्रल सॉल्ट & मराईन चेमिकॅल्स रिसर्च इन्स्टिटयूट “G.B.मार्ग भावनगर ,गुजरात या संस्थेत विज्ञान विषयात “पी एच डी” पदवी प्राप्त केली.या मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सार्थक निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी श्री संदीप तात्या नाईकवाडी,मा.नगरसेवक भाऊसाहेब नाईकवाडी,सुरज गाढवे,संजय साबळे,प्रभाकर गाढवे,नितीन नाईकवाडी,तानाजी नाईकवाडी,राकेश जाधव यांच्यासह नाईकवाडी परिवारातील सर्व सदस्य,मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते.