
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
राज्यातल्या गावा गावात कुठल्याही प्रवर्गातील गरीब माणसावर अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडण्याचे काम दलित पँथरने करावे, अश्या प्रकारची प्रकरणे राज्यात कोठेही घडत असल्यास राज्यसरकारच्या निदर्शनाद आणून द्यावीत मंत्री म्हणून सर्वतोपरी मदत करेन असे प्रतिपादन मा. मंत्री शंभूराजे देसाई याने केले दलित पॅंथरच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले. या वर्धापन सोहळ्यात सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात कामकारणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या वेळी मा. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
दलित पँथरचे अध्यक्ष सुखदेव सुनावणे म्हणाले कि नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी दलित पँथर लढली आज हि ढसाळांच्या वारसा संघटना चालवत आहे. फक्त दलितांसाठी नव्हेतर कुठल्याही समाज्याच्या कुटुंबावर जर सामाजिक अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध पँथर आवाज उठवत आहे रस्त्यावर च्या लढाई सोबतच कायदेशीर लढाई हि लढत आहोत अनेक अत्याचारांना पँथरने वाचा फोडली आहे. राज्यसरकारने या लढ्यास आम्हाला मदत केली तर अशी प्रकरणे कमी होतील अशी अपेक्ष व्यक्त केले.
या वेळी कणेरसर-पूर येथे नामदेव ढसाळ यांचे स्मारक उभारण्या सोबतच यमाईदेवी परिसरास पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचे आश्वासन मा. मंत्री शभूराजे देसाई याने दिले. याच वेळी सातमावळे संवर्धन संस्थेच्या वतीने सुखदेव सोनावणे यांच्या कार्याचा गौरव मा. देसाई साहेबानी केला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व विशेष उपस्थिती मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते परंतु काही कामानिमीत्ताने ते हजर राहू शकले नाही परंतु कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्या पाठवल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुखदेव तात्या सोनावणे (महाराष्ट्रराज्य प्रदेश अध्यक्ष ) दलित पँथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मा. मंत्री देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला काव्य, साहित्य, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानचिन्ह , शाल, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यामध्ये सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड, प्रा.राजेंद्र सोनवणे (काव्य, साहित्यिक)सी एच हिरेमणी (सरकारी क्षेत्र) , प्रा. शिरीष देसाई (शिक्षण क्षेत्र), संजयभाऊ खंडागळे (सामाजिक) डॉ. कृष्णकांत (उद्योजक) आझम शेख (उद्योजक), राजेशजी बन हिमालक (डायरेक्टर प्रोड्यूसर), राजेश प्रसाद (उद्योजक), आबासाहेब पाटील (सामाजिक), विलास पवार( साहित्यिक, सामाजिक ) म्हसळा-रायगड, इत्यादी अनेकांना सम्मानित करण्यात येवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यात अभिनेत्री नम्रता गायकवाड कला, नाट्य, राजेंद्र सोनावणे काव्य, सौ हिरेमनी सरकारी क्षेत्र, प्रा शिरीष देसाई शिक्षण, संजय खंडागळे सामाजिक, डॉ अली मर्चन्ट, उदोजक प्रशांत वाघमारे उदोजाक, आझम शेख, राजेशजी बन्सल, हिमांशू मलिक सिनेनिर्माते, राजेश प्रसाद, आबासाहेब पाटील, विलास पवार साहित्यिक इत्यादी मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला.
दलित पॅंथरच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विशेषांकाचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. शुभम सोनवणे दलित पँथर विद्यार्थी आघाडीचे, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…