
दै.चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा- तालुक्यातील रेशन दुकान दाराने रेशनकार्ड धारकांचे माल देण्याच्या अधी आंगठ्याचे ठसे घेवुन रेशनकार्ड धारकांची फसवणूक करीत असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने माननीय तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे कि परंडा तालुक्यातील रेशन दुकानदार हे कार्ड धारकांना माल देण्याच्या अगोदर अंगठे घेवून कार्ड धारकांची फसवणुक करीत असून व रेशन दुकानदार दुकान सकाळी चार तास व सायंकाळी चार तास उघडे ठेवणे बंधनकारक आहे व रेशनकार्ड धारकांची फसवणुक थांबविण्यात यावी व रेशनकार्ड धारकांचे आंगठ्याचे ठसे घेताच माल देण्यात यावा हि नम्र विनंती माहीती अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे रेशनचा माल दुकानात येण्याआधी किंवा माल नसतानाही आंगट्याचे ठसे घेतले जातात हा सर्व गैरप्रकार थांबवण्यात यावा रेशनमाल विक्री केल्यानंतर कार्ड धारकांना पावती देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे
या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ते परंडा फारुख शेख, कानिफनाथ सरपणे, विजय मेहेर,धनंजय गोफणे,जमिर सिकलकर,अस्लम पल्ला, किशोर येवारे, राहुल बनसोडे, निहाल सिकलकर, आबा कोकाटे, आप्पा बनसोडे, प्रसाद आगवने यांच्या हस्ते स्वाक्षरी करुन परंडा तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले…