
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:- भूम पोलीस ठाण्याचे नवीन कार्यरत असलेल्या व गेल्या पंधरा दिवसांमध्ये पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांचा सत्कार मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी केला.मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.यावेळी मा.नगरसेवक धनंजय मस्कर,बबलू भाई बागवान,सुरज गाढवे,माजी पंचायत समिती उपसभापती रामकीसन गव्हाणे,पत्रकार प्रमोद कांबळे उपस्थित होते.