
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांची उत्तुंग कामगिरी…
शहरात कुठेही कचरा दिसला की पहिल्यांदा घाण, अस्वच्छता याचे चित्र पाहायला मिळते पण यापेक्षा वेगळे चित्र अंबाजोगाई येथे पाहायला मिळाले अंबाजोगाईत कचरा नियोजनासाठी कचरा डेपो ची निर्मिती केलेली आहे. त्याच कचरा डेपोत नंतर ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण वेगळेपण करून त्यापासून काही टाकाऊ पासून टिकाऊ बनते का याचा विचार नगरपरिषद अधिकारी कर्मचारी व गावकरी यांच्यात सतत होत होता व हे फक्त विचारातच न राहता आता सत्यात उतरून दाखवले आहे ते नगरपरिषदेच्या कर्मचारी यांच्या अपार मेहनती मुळे. हा आदर्श नक्कीच सर्व नगरपरिषद यांना होईल.
सविस्तर माहिती अशी की,
*मा.मुख्याधिकारी श्री अशोकजी साबळे साहेब* यांच्या आदेशानुसार
नगर परिषद स्वच्छ्ता निरीक्षक तथा स्वच्छ्ता विभाग प्रमुख अनंत वेडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार
नगर परिषद डंपिंग ग्राउंड *सुपरवाजर राजकुमार जोगदंड* व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी सर्वे नंबर १७ (कचरा डेपो) या ठिकाणी दैनंदिन शहरातील कचरा संकलन करून कचरा डेपो या ठिकाणी शेंद्रिय खत व गांडूळ खत तयार केला त्या अनुषंगाने औरंगाबाद येथील फर्टीलायझर टेस्टिंग लॅब खत नमुने पडताळणी करण्याकरिता पाठवण्यात आले असता, *त्या खतास हरित महासिटी कंपोस्ट बँड ची मंजुरी मिळाली* आहे, त्या बद्दल स्वच्छ्ता निरीक्षक *अनंत वेडे साहेब* व डंपिंग ग्राउंड चे सुपरवायझर राजकुमार जोगदंड यांचे नगर परिषद कार्यालय तसेच स्वच्छ्ता विभाग मार्फत व सर्व स्तरातून यांच अभिनंदन होत आहे…