
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
नांदेड – दरवर्षी नैसर्गिक आपत्ती सह ईतर कारणांनी बळीराजाच्या शेततील पिकांचे अतोनात नुकसान होतं त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडतो. आशा वेळी शेतीतील झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पिकाविमा योजना सुरू करण्यात आली . यापुर्वी पिकविम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांनाच भरावी लागत होती यावर्षी 1 रूपायांत पिकाविमा काढून मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांनी पिकविमा काढून घ्यावा असे आव्हान महाराष्ट्रातील अल्प कालावधीत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे.
दरवर्षी शेतकर्यांच्या पाठीशी एकापाठोपाठ एक संकटाची मालिका सुरू असून, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आशा अस्मानी सुलतानी संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते परंतु यावर्षापासुन शासनाने शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी जास्त पैशाची तजवीज नकरता एक रुपया शेतकर्यांना भरावा लागणार असल्याने व उर्वरित रक्कम शासन भरणार आहे या योजनेचा शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकर्यांनी पिक विमा काढुन घ्यावा, असे आव्हान आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे.