
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
संतोष ज्ञानोबा भसमपुरे
अहमदपूर धसवाडी
15व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी…
शाळा ही गावाच्या शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया असते हा विचार जोपासून मौजे धसवाडी येथील ग्रामपंचायतने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी साहित्य खरेदी केली आहे त्यात ,बोर्ड,टेबल, कपाट या साहित्याची खरेदी करून आज दिनांक 11/7/2023 रोजी शाळेस देण्यात आली सदर कार्यक्रमास सरपंच ,उपसरपंच आणि सदस्यांनी उपस्थिती लावली होती .तसेच या दिवसाची आठवण म्हणून शाळेमध्ये वटवृक्षाचे झाड पण लावण्यात आले .प्रसंगी गावचे सरपंच सौ सुमनबाई मिरगे ,उपसरपंच लखणभैया घोडके, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष इंद्रजित आयलवाड, सेवानिवृत्त प्राचार्य श्री संजय पौळ,नवनाथ आयलवाड , माजी अध्यक्ष गणपत पाटील,मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता…