दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी न्यू इंग्लिश स्कूल पाभरे विद्यालयामध्ये सकाळी 11:00 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाचे पूजन व प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पावसाळ्याचे औचित्य साधून विविध सावलीचे , फुलांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम शाळेचे प्र.मुख्याध्यापक श्री कदम एम. ए . शाळेचे गुरुदेव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,स्थानिक सल्लागार स्कूल कमिटीचे चेअरमन अनिल बसवत व स्कूल कमिटीचे सदस्य , पाभरे गावच्या पोलीस पाटील श्रीम. मनीषा मोरे यांच्या उपस्थित पार पडला.