
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- देशाचे आदरनिय परिवहन मंत्री श्री नितिनजी गडकरी साहेबांनी मार्च 2022 मधे पार्लमेंट मधे घोषणा केली होती की दोन टोल नाक्या मधील अंतर 60 किमीच्या आतील नसेल.परंतु हतनूर ता.कन्नड येथे मार्च 2021 ला टोल नाका चालू केल्या नंतर त्याच धुळे सोलापुर हायवे वर हातनूर पासून 45 किमीवर करोडी ता.खुलताबाद जि.औरंगाबाद येथे दुसरा टोल नाका चालू करण्यात आला.
सदरच्या दोन टोल नाक्या पैकी एक टोल नाका बे कायदेशिर पणे उभारण्यात येत आहे हे माहिती आसून देखील कन्नड आणि खुलताबाद या दोन तालुक्यातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आजी माजी नेते मंडळी 10 जूलै 2023 पर्यंत गप्प का बसली हा एक संशोधनाचा विषय आहे.
दि.25 जून 2023 रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटनेशी सलग्न आसणार्या धामनोद मध्य प्रदेश येथील एम पी 45 G 3033 या क्रमांकाच्या गाडीला हतनूर टोल नाक्यावर परतीच्या प्रवासा मधे बे कायदेशिर अडवून ड्रायव्हरकडे 3500 रूपयाची मागणी करण्यात आली होती तसेच त्याच तारखेत त्याच हतनूर टोल नाक्यावर पाचोरा आगाराची पंढरपूर यात्रे वरूण परत येत आसणार्या एस टि बसला देखील बे कायदा थांबवुन ठेवले होते. सदरच्या बस ड्राइवरकडे पाचोरा आगाराचा टोल माफीचा परवाना आसून देखील टोल कर्मचारी गाडी सोडत नव्हते.
करोडी व हतनूर टोल नाक्यावर आसे प्रकार नेहमीच घडत आसतात परंतु वाहन धारक बाहेर राज्यातील बाहेरील जिल्ह्यातील आसल्या कारणाने त्यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक सहन करत आसतात.
वरील कारणाने दि.10 जून 2023 रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर या़च्या नेतृत्वाखाली तब्बल पाऊण तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलन यशस्वीतेसाठी अजय शिरसाट रा.बहिरगाव ता.कन्नड यांनी विशेष परीश्रम केले ,नंदुरबार, धुळे,अंबड तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो चालक मालकांनी सहभाग घेतला होता.
हतनूर येथील सदरचा टोल नाका त्वरीत हटवण्यात यावा अन्यथा संघटनेच्या वतीने येत्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मुंबई येथील मंत्रालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल आशा आसयाचे निवेदन राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयाचे अधिकारी संघर्ष मिश्रम व अशिष देवतकर यांना देण्यांत आले आहे.