
तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांची माहिती…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ जुलै रोजी लोहयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय लोहा तालुका व लोहा शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव एकमताने मंजूर झाला असल्याची माहिती काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी दिली.
लोहा येथील सरदार साॅ मिल मध्ये दि. १० जुलै रोजी लोहा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते डॉ. शंकरराव चव्हाण यांची दि. १४ जुलै रोजी रोजी जयंती असुन त्यानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत “रक्तदान हे जीवदान वाचवी रुग्णांचे प्राण” याप्रमाणे लोहयात दि. १४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता शिवकल्याण नगर येथील गोविंदराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी दिली.
यावेळी या बैठकीला काँग्रेस चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद श्रीनिवास मोरे, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा शहराध्यक्ष सोनू संगेवार, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, लोहा तालुका सचिव दिलीप जाधव, लोहा तालुका उपाध्यक्ष भगवानराव पाटील सुरनर, लोहा शहर उपाध्यक्ष संजय कहाळेकर, माजी नगरसेवक शरफोदीन शेख,पंकज परिहार,उतम महाबळे,, दत्ता पाटील दिघे, बाबासाहेब बाबर, भगवानराव सुरनर,अनिल दाढेल, पांडूरंग शेटे,बाबासिंग ठाकूर, संजय पवार, अर्जुन महाबळे,देवकते,उतरवार,बाबु कुरेशी, संतोष पवार, यांच्या सहित मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.