
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा.दवणे
जालना मंठा..
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून हाय पावर कमिटीच्या झालेल्या बैठकीमध्ये मंठा येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आली आहे
या उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी 27 कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी तर कर्मचारी निवासस्थानांसाठी 22 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे
याबाबत बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, मंठा शहरे पन्नास हजार लोकवस्तीचे शहरातून तालुका भरातून येणाऱ्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय एवढ्या सुविधा देऊ शकत नव्हते, यासंदर्भामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता यासंदर्भामध्ये आरोग्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार ही करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वाचा विषय हाय पावर कमिटीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
या संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली निघाला असून यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला जालना येथे जाणे आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हते ही गोष्ट ध्यानात घेऊन या संदर्भामध्ये पाठपुरावा केल्याने उच्च दर्जाच्या सुविधा मंठा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होतील असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले आहे
मंठा शहरातून शेगाव पंढरपूर व छत्रपती संभाजी नगर परभणी नांदेड हा महामार्ग जातो वेळोवेळी या ठिकाणी अनेक अपघात होतात अशा परिस्थितीमध्ये वेळीच इलाज न झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत होते त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेसाठी उपयोग होणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे…