
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – बुधवार रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा निगडी येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्री.गणूजी बारे यांच्या शेतात जाऊन भात लावणी केली.भात लावणी करत असताना भाताची रोपे उपटून त्याची मुट बांधणे, बांधलेले रोपाचे मुट वहन करणे,तसेच प्रत्यक्ष भात लावणी केली.भात लावणी बाबत सौ.रुचिता बारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आनंदाने सदर उपक्रमात भाग घेतला.शिक्षक श्री.रमेश जाधव आणि सौ. रंजना चौरे यांनी सुध्दा भात लावणीचा अनुभव घेतला. सदर उपक्रमाबद्दल माझी सरपंच श्री.महादेव पाटील साहेब, गावाचे माझी अध्यक्ष श्री.गणुजी बारे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.संतोष पाटेकर ,विद्यमान सरपंच सौ.वेदिका पाखड ,विद्यमान उपसरपंच जयवंत मोरे ,मिलिंद मोरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.