
भोकर तालुका प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार.
माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे जनक डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज भोकर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये सकाळी ९ वाजता त्यानंतर ९:३० वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर, येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानंतर जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत “रक्तदान हेच जीवनदान वाचवी रुग्णांचे प्राण ” याप्रमाणे सकाळी ठीक १०:०० वाजता शहरातील मोंढा मैदान येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून महारक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून सर्वश्रेष्ठ असलेले पवित्र असे रक्तदान करावे असे आवाहन नवनिर्वाचित भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल यांनी केले आहे.