
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम येथे शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीनुसार, 80 % समाजकारण व 20% टक्के राजकारण याला अनुसरून आगामी काळात शिवसेना आणखीन तळागाळापर्यंत समाजकार्य कायमस्वरूपी चालू राहील.शिवसैनिकांची एकजूट मतदारसंघात क्रांती घडवणार आहे.तसेच आजपर्यंत पक्षाला अनेक धक्के बसले परंतु त्या संकटातून पक्ष हा फिनिक्स भरारी घेत उंचावत गेला.तसेच हे पण संकट निघून जाईन व पक्षाला आणखीन गत वैभव प्राप्त होईल हा विश्वास व्यक्त केला.जनतेसमोर महागाई,राज्यातील व देशातील असुरक्षितता,महिलां वरील अन्याय,अत्याचार,आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा,खरीप हंगामामध्ये पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी हातबल झालेले असताना शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही आणखीन भक्कम तरतूद केलेली नाही.आधी विषय शासन गांभीर्याने घेत नसून याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.याविषयी शासनाने जर कठोर पावले उचलली नाही तर रस्त्यावर उतरून अक्रमक पवित्रा घेतला जाईल असेही यावेळी सांगितले.या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रणजीतजी पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर,शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष उमाताई रणदिवे,शिवसेना समन्वयक दिलीप शाळू महाराज, माजी तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख अनिल शेंडगे,युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे,युवासेना विधानसभा अधिकारी प्रल्हाद अडागळे,युवा सेना संघटक अजित तांबे,शहर प्रमुख प्रकाश अकरे,अविनाश जाधव,रामभाऊ नाईकवाडी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी ,शिवसैनिक,युवासैनिक आधी मोठ्या संख्येने उपस्थितत होते…