
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सदरील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पोटी एकरी दहा हजार रुपये मदत देण्यात यावी व 2022 23 मधील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे असे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी सचिन ओंबासें यांना देण्यात आले.या निवेदनात असं म्हंटलं आहे की भूम परंडा वाशी मतदारसंघांमध्ये चालू खरीप हंगामामध्ये पाऊस हा दीड महिना उशिरा सुरू झाला आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. भूम परंडा वाशी शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या परंतु खरीप हंगामाच्या प्रेरणे पूर्ण केल्यापासून पिकाला लागणारा पाऊस न पडल्या कारणाने बहुतांशी ठिकाणी उगवलच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट उभारले आहे.त्यामूळे बहुतांशी शेतकरी आर्थिक अडचणी सामोरे जात आहे तरी जिल्हाधिकारी यांनी आपल्या मार्फत शासनाला ज्या ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामामधील दुबार पेरणी करावी लागत असेल अशा सर्व शेतकऱ्यांना शासन मार्फत बी बियाणे खते मोफत उपलब्ध करून द्यावेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये तात्काळ मदत करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना करण्यात आली आहे.परंडा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे,कार्याध्यक्ष.ॲड.सिराज मोगल ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे विधानसभा युवक उपाध्यक्ष मोईज सय्यद,महादेव जाधव,प्रभाकर डोंबाळे, बाशाबाई शेख,ॲड घनश्याम लावंड, राजाभाऊ सरवदे सादिक शेख आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…